मानवलोक ने दिला कष्टकरी कुटूंबान न्याय दगड फोडणा-या वडरसमाजाचे कुटूंबान मदत

Dharur

धारूर/ईरफान शेख

धारूर शहरालगत असणाऱ्या  वडर समाजाला जे दगड फोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणा-या १८ कुटुंबान मानवलोकने या कठीण काळात जिवनावश्यक वस्तूचा पूरवठा करून मदतीचा हात देण्याचे काम केले .

मानवलोक या संस्थेने कोरोना प्रादूर्भाव रोकण्या साठी असणाऱ्या कठीण काळात तालूक्यात अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे मानवलोकचे कार्यवाह अनिकेतभैय्या लोहीया यांनी स्वतःलक्ष देऊन गरजूचे मदती करता व प्रशासनास सहकार्य करण्या करता पुढे सरसावले आहे.

हि मदत करत आसतान ख-या गरजूना मदत करण्यासाठी मानवलोक पुढाकार घेत आहे सहा महीणे दगड फोडून तर सहा महीणे ऊस तोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणा-या वडर समाजाचे १८ कुटुंबा वर लाॕकडाऊन मुळे काम बंद झाल्याने हे अडचणीत आले होते.

मानवलोकचे  कार्यकर्ते लखन सिरसट व आश्रूबा घोडके यांनी या भागात सर्व्हे करून आशी कुटुंब निवडली या १८ कुटूंबान मानवलोकच्या वतीने सर्व जिवनवाश्यक वस्तूचा समावेश असणारी किट चे वितरण करण्यात आले व सर्वांनी शासकीय नियमाचे पालन करावे असे अवाहण करण्यात आले यावेळी पञकार अनिल महाजन ग्रामसेवक संजय देशमूख अतुल शिनगारे लखन सिरसट, आश्रूबा घोडके सुनिल तोंडे जायभाये आदी उपस्थीत होते.

Sharing

Visitor Counter