पादचाऱ्यांना कंटेनरची धडक;सहा तरुणांचा जागीच बळी

Beed

 पादचाऱ्यांना कंटेनरची धडक;सहा तरुणांचा जागीच बळी

बीड,प्रतिनिधी 

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाटा परिसरात शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. दर्शनासाठी निघालेल्या सहा पादचाऱ्यांना भरधाव कंटेनरने चिरडले. अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये दिनेश दिलीप पवार (२५), पवन शिवाजी जगताप (२५), अनिकेत रोहिदास शिंदे (२५), किशोर गुलाब तौर (२४), विशाल श्रीकृष्ण काकडे (२३), आकाश अर्जुन कोळसे (२५) यांचा समावेश आहे. सर्वजण बीड शहर व परिसरातील रहिवासी असून शनिवारी पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी निघाले होते.

पहाटे सुमारास एन.एल.०१ ए.जी.३१९७ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सहा युवकांचा बळी गेला. अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, निष्काळजी कंटेनर चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक खोळंबली होती.अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, महामार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कधी होणार? मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्घटनेमुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 

 

 

Sharing

Visitor Counter