मानवलोक ने दिला कष्टकरी कुटूंबान न्याय दगड फोडणा-या वडरसमाजाचे कुटूंबान मदत

धारूर/ईरफान शेख
धारूर शहरालगत असणाऱ्या वडर समाजाला जे दगड फोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणा-या १८ कुटुंबान मानवलोकने या कठीण काळात जिवनावश्यक वस्तूचा पूरवठा करून मदतीचा हात देण्याचे काम केले .
मानवलोक या संस्थेने कोरोना प्रादूर्भाव रोकण्या साठी असणाऱ्या कठीण काळात तालूक्यात अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे मानवलोकचे कार्यवाह अनिकेतभैय्या लोहीया यांनी स्वतःलक्ष देऊन गरजूचे मदती करता व प्रशासनास सहकार्य करण्या करता पुढे सरसावले आहे.
हि मदत करत आसतान ख-या गरजूना मदत करण्यासाठी मानवलोक पुढाकार घेत आहे सहा महीणे दगड फोडून तर सहा महीणे ऊस तोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणा-या वडर समाजाचे १८ कुटुंबा वर लाॕकडाऊन मुळे काम बंद झाल्याने हे अडचणीत आले होते.
मानवलोकचे कार्यकर्ते लखन सिरसट व आश्रूबा घोडके यांनी या भागात सर्व्हे करून आशी कुटुंब निवडली या १८ कुटूंबान मानवलोकच्या वतीने सर्व जिवनवाश्यक वस्तूचा समावेश असणारी किट चे वितरण करण्यात आले व सर्वांनी शासकीय नियमाचे पालन करावे असे अवाहण करण्यात आले यावेळी पञकार अनिल महाजन ग्रामसेवक संजय देशमूख अतुल शिनगारे लखन सिरसट, आश्रूबा घोडके सुनिल तोंडे जायभाये आदी उपस्थीत होते.








