लाॅकडाऊन काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावल्या एच पी गॅस एजन्सी कर्मचारी यांचा कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने त्याचा केला सन्मान

लाॅकडाऊन काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावल्या एच पी गॅस एजन्सी कर्मचारी यांचा कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने त्याचा केला सन्मान
किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर व केज तालुक्यात हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे श्री स्वामी समर्थ गॅस एजन्सीकडे ३४७२३ ग्राहक आहेत. भारत देश कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन झाले आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या लाॅकडाऊन काळात किल्लेधारूर तालुका,केज तालुका,व आडस या भागात उत्कृष्ट कर्तव्य बजावल्या एच पी गॅस एजन्सी कर्मचारी याचा कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने त्याना सन्मानित केले
भारत देशातील छोटा उद्योगधंद्यापासून मोठ्या उद्योगधंद्यापर्यंत सर्व उद्योगधंदे बंद होते. सर्व बाजारपेठ बंद होती. देशातील गोरगरीबां पासून श्रीमंतांपर्यंत सर्व जनता ही घरीच बसून होती. घरात बसून राहायचे असेल तर नक्कीच गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात लागणार होते.
देशातील खाजगी व शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे सुट्टी होती परंतु घराघरात या गॅस सिलेंडरमुळे घरातील स्वयंपाक होणार असल्याने या एजन्सीमध्ये काम करणारे कर्मचारी बांधवांना सुट्टी नव्हती. श्री स्वामी समर्थ गॅस एजन्सीमध्ये तीस कर्मचारी दोन्ही तालुक्यात मिळून कार्यरत आहेत.
पंतप्रधान उज्वला गॅस एजन्सी योजनेतून १२२२३ ग्राहक आहेत या सर्वांच्या खात्यावर गॅस सिलिंडरचे पैसे केंद्रशासन अनुदानाच्या स्वरूपात सिलेंडर घेणाऱ्या खातेदारास जमा केले असल्याने त्यांना एक गॅस सिलेंडर घरपोच करावीच लागते.हे सर्व कर्मचारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत दोन्ही तालुक्यात मिळून दररोज ६०० ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच केले.
कोरोना संसर्ग विषाणू संसर्गामुळे देशच लॉकडाऊन होता, किल्ले धारूर व केज तालुक्यात सर्व नागरिक घरात बसून होते परंतु व्यवसायिक उद्देश असला तरी सर्वत्र नागरिकांना गॅस सिलेंडर लागणार असल्याने त्यांचा स्वयंपाक बंद पडू नये म्हणून या गॅस एजन्सीचे सर्व तीस कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून घरपोच सेवा दिली. वितरण करणारे २२ कर्मचारी हे दोन्ही तालुक्यात वाहनांच्या व सायकलच्या साह्याने ६०० सिलेंडर घरपोच करत आहेत. हे कर्मचारी तिव्र उन्हाळा व कोरोना महामारी असतानाही आपले कर्तव्य या संकटात पार पाडले आहे. अशा या कर्मचारी बांधवांना नक्कीच या महामारीतील मोठे योद्धेच म्हणावे लागेल. तसेच आपले घरदार सोडून अविरत सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे काम नक्की स्तुतिप्रिय असल्याने कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ गॅस एजन्सीचे संचालक सयाजिराव गायकवाड साहेब, मॅनेजर सुनिलराव भोसले व सर्व कर्मचारी बांधवांचा कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अलंकार जी कामाजी यांनी सर्व एजन्सी कर्मचारी याना त्याच्या वतीने मास्क देण्यात आले
यावेळी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिलजी महाजन, जेष्ठ व्यापारी तथा कायाकल्प जेष्ठ सदस्य कृष्णा अण्णा चिद्रवार, शिवसेना तालुका अध्यक्ष तथा कायाकल्प सदस्य, नारायण कुरुंद, वडवणी येथील सहायक प्रशासन अधिकारी सतिषजी देशपांडे साहेब,जलदुत विजय शिनगारे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, कायाकल्प फाऊंडेशनचे सचिव विश्वानंद तोष्णिवाल, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई, ज्ञानेश्वरजी शिंदे, संस्थेचे सदस्य व पदाधिकारी व गॅस कर्मचारी हे उपस्थित होते.
