चंदन तस्कर टोळीवर बीड पोलिसांचा छापा : ८ आरोपी जेरबंद, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदन तस्कर टोळीवर बीड पोलिसांचा छापा : ८ आरोपी जेरबंद, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड,प्रतिनीधी
सौताडा शिवारातील जामखेड रोड व वंजारा फाटा परिसरातून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बीड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आठ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मधुसुदन घुगे व त्यांच्या पथकाने केली. त्यांनी पंचासमवेत सापळा रचून २५ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजता संशयित इसमांना अडवले. तपासणी दरम्यान त्यांच्या जवळ ५६ किलो चंदनाचा छिललेला गाभा, झाड तोडण्याचे साहित्य, ४ मोटारसायकली व ६ मोबाईल्स आढळून आले.
पो.ह. शरद बहीरवाळ यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३५/२०२५ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०३(२), महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम १९६४ चे कलम ३ व ४, तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ व ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींची नावे पुढीलप्रमाणे १) संतोष रामदास पवार, २) गोविंद पंढरीनाथ निकम, ३) अमोल एकनाथ मुरकुटे, ४) छगन आश्रुबा दराडे, ५) संदीप मुंगाजी जाधव, ६) अजीनाथ जगन्नाथ गायकवाड, ७) अंकुश गणपत शिंदे, ८) अरुण लक्ष्मण अडागळे, तसेच चंदन खरेदी करणारा शिवाजी विटकर याचा समावेश आहे.
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही कामगिरी सपोनि मधुसुदन घुगे, पो.ह. शरद बहीरवाळ व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अवैध व्यवहारांबाबत माहिती असल्यास संवाद प्रकल्पाच्या QR कोडद्वारे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवावी. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.








