मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त आष्टी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम

मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त आष्टी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या 57 व्या वाढदिवसा निमीत्त आष्टी तालुक्यात मा.रामहरी भैय्या मेटे ( जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम युवक बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यांत येणारं असुन , त्या मध्ये शेतकर्याना मोफत बी बीयाणे, जनावरांसाठी कॅल्शियम वाटप, चिञकला स्पर्धा, कोरोणा योद्धा सन्मानपञ, नवजीवन बालगृह येथे धान्य वाटप, तसेंच वृक्षारोपण, असे विविध सामाजिक उपक्रम घेऊन मेटे साहेबांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात आष्टी तालुक्यात साजरा करण्यात येणारं असुन हे सर्व कार्यक्रम शिवसंग्राम युवक आघाडी आष्टी तालुक्याच्या वतीने घेण्यात येतं आहेत अशी माहिती शिवसंग्राम युवक आघाडी चे युवा नेते सचिन टकले, संदिप झांबरे यांनी दिली आहे.
