तबलीग जमातचे बीडचे अमीर सय्यद नजिब मौलाना यांचे निधन

Beed

तबलीग जमातचे बीडचे अमीर सय्यद नजिब मौलाना यांचे निधन

बीड, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील तबलीग जमातचे अमीर (प्रमुख) सय्यद नजिब मौलाना साहब यांचे शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी रात्री 9:30 वाजता काकू-नाना हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. अल्पशा आजाराने त्रस्त असलेल्या सय्यद नजिब साहब यांनी तबलीग जमातच्या कार्यामध्ये आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते.

सय्यद नजिब मौलाना हे बीड शहरातील मर्कज मस्जिद समोरील कारंजा भागात राहात होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावत होती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे तबलीग जमात आणि सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सय्यद परिवाराच्या दुःखात बीड प्रसार परिवार सहभागी आहे.

Sharing

Visitor Counter