बीड विधानसभा मतदार संघातील पारधी समाजाचा वीस वर्षापासून प्रलंबित घरकुलचा प्रश्न लावला मार्गी

आपल्या हातुन जेव्हा वंचित उपेक्षितांचे एखादे काम होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि हुस येते ते म्हणजेच जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार -आ संदीप क्षीरसागर
बीड विधानसभा मतदार संघातील पारधी समाजाचा वीस वर्षापासून प्रलंबित घरकुलचा प्रश्न लावला मार्गी
बीड/प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाज हा विकास पासुन वंचित आणि उपेक्षित राहिला असुन वरून समाजावर गुन्हेगारीचा ठपका लागला आहे. असे असुन सुध्दा देशात आणि बीड जिल्ह्यात हा समाज उपजीविकेसाठी भटकंती करून, कष्ट करुन,उघड्यावर राहून गुण्या गोविंदा आणि नांदत आहे. बीड तालुक्यातील लिंबारूई शहाजानपूर येथे पारधी समाज मोठ्या प्रमाणावर असून मागील वीस वर्षापासून हक्काच्या घरासाठी हा समाज लढत होता. आज तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असून, पारधी समाजाला शहाजानपूर परिसरात हक्काचे निवासी घरकुलसाठी 27 गुंटे जमीन आज प्रत्येक्षात दिली आहे. या सर्व लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने शबरी आवास योजना अंतर्गत कायमस्वरूपी मजबूत घरकुल बांधून देण्यात येईल रजिस्ट्री झाल्यावर लिंबारुई/शहाजानपुर येथील पारधी समाजातील माता भगिनी बांधवांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि हसू दिसले तो माझे जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार आहे असे वक्तव्य आ. संदीप क्षीरसागर यांनी पारधी समाजातील बांधवांना जमीन हस्तरेन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मनाचा मोठेपणा करून या पारधी समाज बांधवांना जमीन दिलेले रुई शहाजानपूर सय्यद अशपाक भाई सय्यद मोहम्मद सिद्दिकी भाई यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि वंचित उपेक्षितांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, बीडचे तहसीलदार हजारे, गटविकास अधिकारी सानप,रजिस्ट्री ऑफिसचे सर्व अधिकारी आणि लाभार्थी पारधी समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
