सद्भावना दौडने होणार नववर्षाची सुरुवात

Beed

सद्भावना दौडने होणार नववर्षाची सुरुवात

आयएमए, रोटरी क्‍लब बीड सिटी, सीएनएस फि टनेसचा पुढाकार

बीड/प्रतिनिधी

नववर्षाच्या प्रारंभी प्रत्येकजण वेगवेगळा संकल्प करतो. याचवेळी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या व्यायामाची सुरुवातही व्हावी, बीडकरांमध्ये व्यायामाप्रती आवड निर्माण व्हावी याकरिता आयएमए, रोटरी क्‍लब बीड सिटी व सीएनएस फि टनेसच्या वतीने दि.1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले आहे. चर्‍हाटा फ ाटा येथे होणार्‍या दौडमध्ये बीडकरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पळणे, चालणे हा जगभर उत्तम व्यायाम मानला जातो. पळण्याने आयुष्य वाढतं, कर्करोग आणि ह्रदयाशी संबंधित आजारांनी होणार्‍या मृत्युच्या धोक्याचं प्रमाण पळण्याने कमी होते. पळण्याचा व्यायाम करणारे जर इतर शारीरीक व्यायाम करत असतील तर, त्यांच्या अचानक मृत्युच्या धोक्याचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी होते असे एक ना अनेक फ ायदे आहेत. याबाबत जागरुकता वाढावी, सर्वांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नववर्षाच्या प्रारंभी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले आहे. चर्‍हाटा रोडवरील तुकाराम गुरुजी नगर येथून या दौडला दि.1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 5 कि.मी., 10 कि.मी. अथवा 21 कि.मी. अशा पद्धतीने ही दौड होणार आहे. याबरोबरच स्ट्रावा किंवा रनकिपर हे अ‍ॅप डाऊनलोड करुन तुम्ही तुमचे धावण्याचे अंतरही शेअर करु शकता. या सद्भावना दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयएमए, रोटरी क्‍लब बीड सिटी व सीएनएस फि टनेसच्या वतीने करण्यात आले आहे.

-

Sharing

Visitor Counter