अविद्या महाभयंकर समस्या तर विद्या हा उपाय - दीपक कदम

अविद्या महाभयंकर समस्या तर विद्या हा उपाय - दीपक कदम
बीड/वार्ताहर
शिक्षण हा सर्वच प्रश्नांवरचा उपाय आहे व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. जगामधला अंधकार किंवा अज्ञान नष्ट करण्यासाठी माणसाला शिक्षण घेणं किंवा शिक्षित करणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण क्रांती परिषद बीड येथे दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन नांदेड यांनी केले पुढे बोलताना ते असे म्हणाले की भारताला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर भारतामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढलं पाहिजे 27% शिक्षित समाजाच्या पाठबळावर आपण विश्वगुरू होऊ शकत नाही विश्वगुरू होण्यासाठी आपल्याला आपला साक्षरतेचा जो दर आहे तो तर वाढवावा लागेल विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपल्या राष्ट्रात साक्षरतेचा दर खूप कमी आहे ही एक चिंतनीय बाब आहे या सर्वच गोष्टीवरचा उपाय म्हणजे तरुण पिढी बेस्ट ब्रेन होऊन बाहेर पडणे. सुशिक्षित समाज एक विकसित राष्ट्र घडवू शकतो आणि त्या माध्यमातूनच आपण विश्वगुरू बनत असतो. जगाला ज्ञान देण्याची ज्ञान केंद्रे आपल्या देशामध्ये होते ती म्हणजे तक्षशिला विक्रमशीला नालंदा ही विद्यापीठे जगाला ज्ञानदान देण्याचे काम करायचे पण काळाच्या ओघांमध्ये या ज्ञानदान देणाऱ्या केंद्रावर काही परकीय व स्वकीय आक्रमणे झाले आणि ही ज्ञान केंद्रे नष्ट करण्यात आले. पुन्हा आपल्याला ही ज्ञान केंद्रे स्वबळावर उभा करावी लागतील तरच आपण विश्वगुरू बनू शकतो अन्यथा विश्वगुरू बनने एक दिवा स्वप्न आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा प्रदीप रोडे सर होते अध्यक्षिय समारोप मध्ये ते बोलत असताना असं म्हणाले आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून जे काम समाजापुढे उभे राहिलेला आहे हे काम अधिक विस्तृत होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे वडील रोडे गुरुजी यांच्या एका महिन्याची पेन्शन 25000/- ही राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानास दान दिली. मंचावर नानाभाऊ हजारे उपशिक्षणाधिकारी बीड, बाबासाहेब उजगरे शिक्षण विस्तार अधिकारी वडवणी , संदीप उपरे चलो बुद्ध की और चळवळीचे वारसदार, भानुदास जाधव समन्वयक मराठा क्रांती मोर्चा बीड, अंकुश निर्मळ प्रदेश अध्यक्ष धनगर महासंघ, राजेश तांगडे उदोजक तथा संचालक ग. ना. स. बँक. बीड अड. चंद्रवदन जाधव, व इतर मान्यवर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय सावते,सूत्र संचालन डॉ. विक्रम धनवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. आत्माराम झिंजूर्डे यांनी मानले.
