सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथे विद्यार्थ्यांचे विशेष शिबीरामार्फ़त प्रस्ताव स्विकारुन जात वैधता प्रमाणपत्र वाटप

सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथे विद्यार्थ्यांचे विशेष शिबीरामार्फ़त प्रस्ताव स्विकारुन जात वैधता प्रमाणपत्र वाटप”
माजलगाव/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाने दि.26 नोव्हेंबर 2022 ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे,. या अंतर्गत सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव स्वीकारण्याचे व वाटप करण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बीड जिल्हा जात पडताळणी समितीचे व्यवस्थापक श्री.सुरेश शेंडगे,बार्टीचे समतादूत श्री.ज्ञानेश्वर ढगे यांनी मार्गदर्शन केले.
सदरील आयोजित शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया या सबंधी मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबरच विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले.
जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.
