आंबेडकर घराण्या बाबत अपशब्द वापरणार्या तडीपार गावगुंड जगदीश गायकवाडवर कडक कारवाई करावी - अशोक हिंगे

आंबेडकर घराण्या बाबत अपशब्द वापरणार्या तडीपार गावगुंड जगदीश गायकवाडवर कडक कारवाई करावी - अशोक हिंगे
बीड/प्रतिनिधी
दि 30 पनवेल येथील तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड या विकृत समाजकंटकाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर परिवाराबाबत जहरी गरळ ओकली असुन राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडवुन दंगली घडवण्याच्या दृष्टिकोनातून सदरी निच कृत्य करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी सदरील जगदीश गायकवाड यांस गुन्हा दाखल करून शोधुन जेरबंद करावे तसेच याच्या सर्व गैर व्यवहाराची चौकशी करावी अशी तक्रार पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे. परंतु अद्यापही कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही.
वंचितबहुजनआघाडी,आंबेडकरवादी , संविधानवादी चळवळीतल्या सर्व बंधु भगीणींना सुचित करण्यात येत आहे की सदरील प्रकरण हे आपल्या पक्षाची यशस्वीरित्या होणा-या पुढील वाटचालरोखण्याकरीता आखलेले षड्यंत्र असण्याची शक्यता लक्षात घेता कुठे ही अनुचित प्रकार घडु नये याची खबरदारी घ्यावी अश्या सुचना पक्ष श्रेष्ठींच्यावतिने देण्यात आल्या आहेत.
तेंव्हा या सर्व प्रकाराची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेवुन त्या समाज कंठकावर कडक कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केली आहे.
