ग्रामपंचायत निवडणूक ऑनलाईन अर्ज स्वीकारणे बंद करा व ऑफलाईन अर्ज घ्या - विष्णू मुंडे 

Beed

ग्रामपंचायत निवडणूक ऑनलाईन अर्ज स्वीकारणे बंद करा व ऑफलाईन अर्ज घ्या - विष्णू मुंडे 

 परळी/प्रतिनिधी

दि. 29 कालपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे परळी तालुक्यात जवळपास 80 ग्रामपंचायती आहेत पहिल्या दिवशी फक्त दहाच्या आसपास ऑनलाइन अर्ज भरले गेले अनेक उत्साही कार्यकर्ते यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा फटका बसला ऑनलाइन अर्ज भरण्याची साईट ही खूप स्लो कमी जास्त इंटरनेटमुळे जाम चालत होती त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भरण्याची अनेकांची इच्छा पूर्ण झालेला आहे, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव विष्णू मुंडे यांनी ऑनलाइन पद्धत बंद करून ऑफलाईन पद्धतीद्वारे अर्ज स्वीकारत अशी विनंती तालुका निवडणूक अधिकारी यांना केली आहे जेणेकरून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल. तालुक्यात जवळपास 80 ग्रामपंचायतीच्या होणार आहेत जनतेतून सरपंच असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच-सहा जत्तर सहज इच्छुक आहेत या सर्वांचे किती वेळ लागेल विचार प्रशासन मध्ये करावा जवळपास एक अर्ज भरण्यासाठी तासाचा कालावधी लागत असल्याची माहिती इच्छुक उमेदवारांनी सकाळी आल्यापासून संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत देखील अर्ज भरले गेले नाहीत, अशा अडचणीला समोर जावं लागत असल्यामुळे तात्काळ ऑनलाईन पद्धत बंद करून ऑफलाईन पद्धत आजपासून सुरू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter