छत्रपती शिवाजी महाराज अखंड विश्वाचे प्रेरणास्रोत असुन शिवरायांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही - गणेश बजगुडे पाटील

छत्रपती शिवाजी महाराज अखंड विश्वाचे प्रेरणास्रोत असुन शिवरायांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही - गणेश बजगुडे पाटील
राज्यपाल हटाव मागणीचे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बीड/वार्ताहर
"छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळात आदर्श होते" या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वक्तव्याचा आज बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वात "राज्यपाल हटाव" मागणीचे निवेदन जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आले.
यावेळी गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे कार्य हे विश्वाला वंदनीय असुन सुर्य, चंद्र, तारे असे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्रोत असतील. छत्रपती शिवराय हेच आमचे आदर्श असुन शिवरायांची तुलना जगात कोणाशीही होवु शकत नाही. "राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची साठी बुध्दी नाठी" झालेली असुन त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करत अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर राहण्याचा कसलाही अधिकार नाही म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत "राज्यपाल हटाव" मागणीचे निवेदन दिलेले आहे असे ही काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील म्हणाले यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव वचिष्ट बडे, ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक अशोक बहिरवाल, असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, महिला काँग्रेसच्या ज्योती सपाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
