जिल्हा परिषद शाळेत बालदिन साजरा

Beed

जिल्हा परिषद शाळेत बालदिन साजरा

चौसाळा/वार्ताहर 

धोत्रे येथील जिल्हा परिषद शाळेत १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती साजरी करण्याबरोबरच पंडित नेहरू यांच्या जयंतनिमित्त साजरा करण्यात येणारा बालदिन साजरा करण्यात आला.बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा 'जागतिक बाल दिन' अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, मुख्याध्यापक श्रीमती उबाळे मॅडम, गायकवाड मॅडम, अंकुश कळाशे, सय्यद रौफ उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter