जमीन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चांडक याचे बांधकाम

जमीन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चांडक याचे बांधकाम
चांडक याना अभय कुणाचे ;खोड यांचा सवाल
बीड/वार्ताहर
नगर परिषद हद्दीतील जुना मोंढा येथील पारुबाई गणपत खोड यांच्या मालकी व ताब्यातील जागे प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतं असल्याचे कारण करुन पेठ बीड पोलिसांनी आसाराम चांडक, गणेश आसाराम चांडक, दिनेश आसाराम चांडक आणि पारुबाई गणपत खोड व रामनाथ खोड यांच्या एकमेकांच्या परस्पर विरोधात गुन्हे दाखल करुन या वादग्रस्त्त जागेचा न्यायालयीन निकाल लागे पर्यंत वादी आणि प्रतिवादी या दोघांना ही त्या जागेत जाण्यास कलम 149 अन्वये दिनांक 19/10/202 रोजी नोटीसद्वारे समज देऊन प्रतिबंध केले होते असे असतांना आसाराम चांडक गणेश चांडक आणि दिनेश चांडक यांनी पोलिसांच्या नोटीसचे उलंघन करुन त्या त्या वादगृस्त्त जागेत विना परवाना बांधकाम सुरु केले होते या प्रकरणी पेठ बीड पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे लेखी तक्रार केली असता पेठ बीड पोलीस स्टेशन यांनी नोटीसचे भंग केल्या प्रकरणी कलम 188 अन्वये आसाराम चांडक आणि त्यांचे अन्य दोन मुलांवर दिनांक 29/10/2022 अन्वये गुन्हा नोंद केला आहे परंतु चांडक हे पोलिसांच्या कोणत्याच गोष्टीला कायद्याला न जुमानता त्या वादग्रस्त्त ठिकाणी बांधकाम चालूच ठेवले आहे अन पोलीस बघ्याची भूमिका घेतं आहे दोंघांना त्या जागेत जाण्यासं बंदी घातली असताना संबंधित व्यक्ती पोलिसांच्या नाकावर ठेचून त्या वाढगृस्त्त जागेत सर्रास बेकायदेशीर बांधकाम करत आहे मग पोलीस ऐकाला बंदी आणि दुसऱ्याला बेकायदेशीर बांधकामस संधी देते या पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ शकते या वरुन दिसून येथे आता वरिष्ठ यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
कोर्टाचा निकाल म्हणून दिशाभूल लोकांची केली जात आहे. या जागे प्रकरणी कोर्टात दिवाणी दावा क्र 303/22 चालू आहे अन हा मुळ दावा कोर्टात प्रलंबित आहे.परंतु या दाव्याचा निकाल लागे पर्येंत तात्पुरता मनाई हुकूम द्यावा असा जो अर्ज केला होता तो अर्ज नामंजूर केला आहे मुळ दावा निकाली काढला नाही तो आणखी न्यायप्रविष्ट अन प्रलंबित आहे अन तात्पुरता मनाई हुकूमाचा जो अर्ज फेटाळला आहे त्याच्या विरुध्द वरच्या कोर्टात अपील दाखल केले आहे त्याचा क्र किरकोळ अपील क्र 90/22 असा आहे तो न्यायप्रविष्ट आहे परंतु कोर्टाने निकाल दिला अन खोड यांचा दावा फेटाळला असे सांगून लोकात भ्रम निर्माण केला जात आहे .
रामनाथ खोड
बीड
