अंबाजोगाईत चाकू भोसकून एकाचा खून

अंबाजोगाईत चाकू भोसकून एकाचा खून
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथे किरकोळ कारणावरून एका कार्यकर्त्याचा धारदार शस्त्राने पोटात चाकू भोसकून खून करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथील ग्रा प सदस्य गोरखनाथ घनघाव यांची काल किरकोळ कारणावरून शस्त्रास्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली. चनई गावच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोरखनाथ हे सदस्य म्हणून निवडून आले होते. घनघाव भीम आर्मी या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून कार्य करीत होते. काल सकाळी राशन वाटपावरून गावातील राशन दुकानदारसोबत राशन वाटपावरून घनघाव यांची शाब्दिक चकमक झाली होती. याचाच राग मनात धरून सायंकाळी पाच वाजन्याच्या सुमारास गावातील पाच ते सात जण घनघाव यांच्या घरासमोर जमा झाले व त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत होते. येवढ्यात घनघाव हे घराच्या बाहेर येताच जमलेल्या जमावाने त्यांना पकडले व बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहानी दरम्यान एका व्यक्तीने घनघाव यांच्यावर तिक्ष हत्याराने वार केले यामध्ये घनघाव हे गंभीर जखमी झाले.पुढील उपचारासाठी त्यांना स्वराती मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेबाबतीत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात चालू होती.
