आंबेडकरी आडनाव लावून fb live वर आमदार अमोल( दादा ) मिटकरी यांना trol करण्याचा मनुवाद्यांचा प्रयत्न यशस्वी

आंबेडकरी आडनाव लावून fb live वर आमदार अमोल( दादा ) मिटकरी यांना trol करण्याचा मनुवाद्यांचा प्रयत्न यशस्वी
बीड/परमेश्वर बनकर
अमोल मिटकरी हे विधानपरिषद सदस्य आहेत , ते अरविंद बनसोड या प्रकरणावर आरोपींना शिक्षा करा या संदर्भात पाठपुरवठा करू शकतात आणी ते करत आहेत , परंतु काही bjp अंडर लोक अमोल दादांना असं trol करत आहेत की जसं काही अमोल दादा ग्रहमंत्री किंवा मुख्यमंत्रीच आहेत , अमोलजीचा fb live प्रोग्राम मी स्वतः ऐकला आहे त्या मध्ये एकाने अमोल मिटकरी यांना कॉमेंट केली होती की आता का बाप बदलला त्यावेळी अमोल मिटकरी म्हणाले ज्यांना स्वतः चे मायबाप समजलं नाही त्यांनी माझ्या बाप बदलण्यावर बोलू नाही , यामध्ये मिटकरी यांच काय चुकलं त्याबरोबरच मिटकरी यांच्या वर अनेक खालच्या पातळीवर कॉमेंट करुन त्यांना trol करण्याचा प्रयत्न केला , काल दादा शिवराज्याभिषेकामध्ये व्यस्त असल्यामुळे अरविंद बनसोड प्रकरण त्यांच्या पर्यंत उशिरा पोहोचले , त्यामूळे त्या बाबीवर ते बोलले नाही , असो पुढे ते नक्कीच बोलतील अशी अपेक्षा आहे..परंतु अरविंद बनसोड च्या हत्येबाबतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांना ग्रहमंत्र्यांना प्रश्न विचारायचे सोडून अमोल दादा मिटकरी यांना का टार्गेट केलं जातं आहे आंबेडकरी जनतेची आडनाव लावून काही मनुवादी अमोल दादा आणी नवबौद्दांमध्ये मतभेद निर्माण करत आहेत आणी काही प्रमाणात ते यशस्वी झाले आहेत माझी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण अमोल मिटकरी यांना टारगेट न करता अरविंद बनसोड च्या मारेकऱयांना जो पर्यंत शिक्षा होत नाही तो पर्यंत सरकारला याचा जाब विचारला पाहिजे.
