जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी बैठक

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी बैठक
बीड/वार्ताहर
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 31 मे रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सूचनांनुसार शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी बीड जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास समितीसमोर व्यक्तिशः उपस्थित राहून पुराव्यासह लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे. तक्रारीसोबत पुरावे जोडले गेले नसल्यास अशा तक्रारी समितीध्ये घेतल्या जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
