छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लाखोंच्या संखेने आभिवादन 

Beed

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लाखोंच्या संखेने आभिवादन 

बीड/प्रतिनिधी 

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लाखोच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापशी चाहत्यांची गर्दी जमा झाली असून यावेळेस डीजे मुक्त जयंती उत्सव पार पडत असून यावेळी जयंती देखणी ठरल्याशिवाय राहणार नाही कारण पहिल्यांदाच स्टंट बाइक कार्यक्रम व लेझर शो ठेवण्यात आला आहे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे . ऐतिहासीक शिवजन्मोत्सव सोहळा बीडकरांनी अनुभवला . शिवतेजाने बीडचा सारा आसमंत उजळुन निघाला आहे . जय भवानी जय शिवाजी , जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी जयजयकारात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आला . आज सकाळी आ . संदीप क्षीरसागर , जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , पोलिस अधिक्षक आर.राजा , उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , शल्यचिकित्सक डॉ . सुरेश साबळे , माजी आ.सय्यद सलीम , माजी आ . सुनिल धांडे , शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जिवन जोगदंड , उपाध्यक्ष खुर्शीद आलम , मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक आदींसह शिवभक्तांच्या उपस्थितीत शासकीय महापुजा करण्यात आली . दरम्यान काल मध्यरात्री झालेल्या ऐतिहासीक लेझर शो ने बीडकरांच्या डोळ्यांचे पारण फेडले .

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी बीडमध्ये सलोख्याची पताका फडकताना दिसुन आली . सर्वधर्मीय धर्मगुरू , नागरीकांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले . यावेळी पप्पु कागदे , सीए भानुदास जाधव , प्रा . सुशिलाताई मोराळे , अॅड . शेख शफीक भाऊ , फारूक पटेल , अशोक हिंगे , किशोर पिंगळे , मनोज जाधव , गोपाळ धांडे , सुहास पाटील , अनिल शिंदे आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भगवा ध्वज फडकावून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. 

यावेळी या मातीतील माणसांच्या उन्नतीचे जे स्वप्न आम्ही पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे बळ द्या असे साकडे ना. मुंडे यांनी शिवरायांच्या व आई जगदंबेच्या चरणी घातले. तसेच परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्धार ना. मुंडेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Sharing

Visitor Counter