एआयएमआयएम ची तुफान मेल जोरात;एकवीस जणांना पदांचे वाटप तर चार जणांचा पक्षात प्रवेश

एआयएमआयएम ची तुफान मेल जोरात;एकवीस जणांना पदांचे वाटप तर चार जणांचा पक्षात प्रवेश
ॲड. शेख शफीक भाऊंनी साधला समतोल;नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यात जल्लोष
जिल्हा युवक अध्यक्ष शेख मतीन, तालुकाध्यक्ष शेख एजाज, शहर अध्यक्षपदी शिवाजी भोसकर
बीड/प्रतिनिधी
एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यालयात नवीन एकवीस पदाधिकाऱ्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच चार जणांनी पक्षात प्रवेश केला. नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्ती मध्ये समतोल साधला गेल्याने नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. ही घोडदौड पाहता पक्षाची तुफान मेल जोरात सुटली असल्याचे दिसून येत आहे.
बशीर गंज येथील मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष शफिक भाऊंच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, जिल्हा सचिव हाजी अय्युब खान पठाण, हाफिज अशपाक, मोमीन अजहर, सय्यद इलयास आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये खंबीर व गंभीर नेते शेख एजाज खन्ना भैया यांना बीड तालुका अध्यक्ष पदासह जिल्हा उपाध्यक्ष पद ही देण्यात आले आहे. शेख मतीन यांना युवक जिल्हाध्यक्ष, शिवाजी भोसकर यांना बीड शहराध्यक्ष, नवाब शिकलकर यांना रिक्षा युनियन युनिटचे शहराध्यक्ष, वजीर सर यांना सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष, शेख शाकेर यांना शहर उपाध्यक्ष, सोहेल मोमीन यांना आरोग्य सेल युनिटचे शहराध्यक्ष, फारुख खान यांना ट्रक मालक-चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, एजाज खान यांना ट्रान्सपोर्ट असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष, समी भाई जेके यांना जिल्हा सरचिटणीस, जैफ सिद्दीकी यांना सोशल मीडिया चे बीड शहराध्यक्ष, अबरार बागवान यांना सोशल मीडियाचे बीड तालुकाध्यक्ष, आयान इनामदार यांना सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष, लियाकत बेग यांना गेवराई तालुका सचिव, जानी भाई यांना बीड शहर सचिव, सिद्दीक भैय्या यांना माजलगाव विधानसभा प्रभारी, तौफिक पैलवान यांना नेकनुर शहराध्यक्ष, साजन चौधरी यांना बीड तालुका उपाध्यक्ष, मसरत बाजी यांना बीड शहर महिला आघाडी अध्यक्ष, शेख महेमूद यांना सेवानिवृत्त कर्मचारी बीड तालुका अध्यक्ष, सय्यद अन्सारी साहब यांना सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे बीड शहराध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी पक्षातून लियाकत बेग, सामाजिक कार्यकर्ते तौफिक पहेलवान, आम आदमी पक्षातून नसरत बाजी जमीर भाई आणि सामाजिक कार्यकर्ते अय्युब खान साहब आदींनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या पुनम भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट -
एआयएमआयएम ची सेना ओरिजनल असणार डुप्लीकेट नाही - शफीकभाऊ
पदाधिकारी निवड तसेच प्रवेश कार्यक्रमात संबोधित करताना जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ म्हणाले की, पक्षात निवड केलेले पदाधिकारी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरिस्टर अल्हाज असदुद्दीन ओवैसी, वरिष्ठ नेते तथा आमदार अकबरुद्दीन ओवैसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज़ जलील, महाराष्ट्र कार्याध्यक्ष अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज़ लाला या सर्वांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निवडले गेले आहेत. अजूनही बरीच पदे रिक्त असून पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना त्या पदांवर नियुक्त्या देण्यात येतील. संपूर्ण बीड जिल्ह्यातील एकूण एक पदे भरल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांची ही सेना एआयएमआयएम पक्षाची ओरिजनल सेना असेल. एआयएमआयएम पक्षात इतरांसारखे एका पक्षाकडून निवडून येऊन दुसऱ्या पक्षाशी घरोबा करत बीड नगरपरिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक तिसरीच आघाडी बनवून लढविणाऱ्यांसारखे डुप्लिकेट नेतृत्व नसेल. निवडलेल्या एआयएमआयएम च्या सर्व पदाधिकारी वाघांची सेना ही ओरिजनल असेल असे म्हणत विरोधकांना.
