तलवाडा येथील शनिवारचा आठवडी बाजार बंद व्यापारी,भाजीविक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी.

Georai

तलवाडा येथील शनिवारचा आठवडी बाजार बंद
व्यापारी,भाजीविक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी.

गेवराई/प्रतिनिधी 
     
तलवाड़ा व तलवाडा परिसरातील व्यापारी,भाजीपाला विक्रेते,तसेच नागरिकांना ग्रामपंचायत तलवाडा मार्फत  आवाहन करण्यात आले आहे  कोरोना (कोविड-19) च्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे दिनांक 04/04/2020 च्या आदेशानुसार  तलवाडा येथील शनिवारी भरत असलेला दिनांक-23/05/2020 रोजी चा आठवडी बाजार  हा कडकडीत बंद ठेवण्यात येणारआहे,कोणत्याही व्यापाऱ्यांनी शनिवारी गावात कोठेही आपली दुकान लावू नये तसेच  भाजीपाला विक्रेते यांनी ही कोठेही भाजीपाला विक्रीस बसू नये असे आढळून आल्यास आपल्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,व होणाऱ्या नुकसानास आपण स्वत: जबाबदार रहाल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून  कोणीही शनिवारी आठवडी बाजारात येऊ नये असे ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही खबरदारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली असून,आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या असल्याचे ही सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी  दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
   तसेच  मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांचा पुढील आदेश येईपर्यंत बाजार भरवण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी .

Sharing

Visitor Counter