कोरोनाशी लढण्यासाठी आणि वॉरियर्सच्या मदतीसाठी सरसावले डॉ.चाळक दाम्पत्य

Ashti

कोरोनाशी लढण्यासाठी आणि वॉरियर्सच्या मदतीसाठी सरसावले डॉ.चाळक दाम्पत्य

आष्टी/प्रतिनिधी,
बीड प्रसार न्युज.

ग्रीन झोन मधील बीड जिल्हा पाहता पाहता रेड झोन मध्ये आला.पाहुण्यांनी आणलेल्या वाणवळयातून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित बाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्याची तपासणी झाली आणि त्यातून सध्या तरी कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
तरीदेखील आष्टीतील नागरिकांची काळजी घेण्यासाठी आणि या कोरोनाविषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी या युद्धात आघाडीवर लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी,महसूल कर्मचारी आणि पत्रकार या घटकाच्या मदतीसाठी आष्टी आणि अहमदनगर येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ.प्रा सचिन देविदास चाळक आणि डॉ.ज्योती सचिन चाळक हे होमिओपॅथीचे पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करणारे दाम्पत्य असून आष्टी तालुक्यातील त्यांचे नित्य उपचार घेणारे आणि इतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या डॉक्टर दांपत्याने सुमारे १८ हजार ६५० नागरिक आणि कोरोना वारीयर्स यांचेसाठी विनामोबदला आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक असलेले  होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचे वाटप केले आहे.त्यांना या कामी आष्टी येथील डॉ.वारंगुळे व सहकार प्रतिष्ठाणने मदत केली .
       दि. २० आणि २१ मे रोजी स्वतः च्या दवाखान्यातून जनतेसाठी वाटप केले असून उपअधीक्षक विजय लगारे,
तहसीलदार नीलिमा थेऊरकर,नायब तहसीलदार शारदा दळवी यांचेसह सर्व कर्मचारी, तलाठी, कोतवाल आणि उपअधीक्षक यांचे कार्यालयातील कर्मचारी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे आणि पोलिस कर्मचारी तसेच पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,पत्रकार उत्तम बोडखे,सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,पत्रकार शरद तळेकर, पत्रकार गणेश दळवी,पत्रकार प्रविण पोकळे यांना ही औषधे वाटप करण्यात आली.
पुढील १५ दिवसानंतर पुन्हा एकवार अशाच पद्धतीने या आर्सेनिक अल्बम-३० वाटप करण्यात येईल.आणखी कोणीही गरजू व्यक्तीनी मागणी केल्यास आपण विनामूल्य या औषधांचे वाटप सुरू वाटप करू असे डॉ. सचिन चाळक,डॉ.ज्योती चाळक यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ही औषधी प्रभावी ठरली असल्याचे डॉ.चाळक यांनी यावेळी म्हटले

Sharing

Visitor Counter