जालनाकरांची धाकधूक वाढली,पुन्हा पाच पॉझिटिव्ह रूग्णांची भर

जालनेकरांची धाकधूक वाढली,पुन्हा पाच पॉझिटिव्ह रूग्णांची भर
जालना प्रतिनिधि
जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा पाच रूग्णांची भर पडली आहे. त्यात जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयाशी कनेक्शन असलेल्या चार जणांचा तर अंबड तालुक्यातील शिरनेर येथील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या पाच रुग्णांमुळे जिल्ह्याची संख्या आता 41 वर पोहचली असून जालनेकरांची धाकधूक अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्हा रुग्णालयाने काल मंगळवारी जालना शहरातील एक खाजगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह आढळून आलेल्या प्रतिष्ठित डॉक्टरसह या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले पेशंट तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले होते. तसेच जालना तालुक्यातील नूतनवाडी,आणि अन्य भागातील मिळून एकूण 66 संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने काल मंगळवारी दुपारी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. याबाबतचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून त्यात जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह आढळून आलेल्या डॉक्टरसह कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्तींचा समावेश असून एक जण अंबड तालुक्यातील शिरनेर येथील असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे
