धावत्या हायवा ट्रक घेतला पेट शनिवारी दुपारी अबंड राज्यमहामार्गावरील घटना

धावत्या हायवा ट्रक घेतला पेट
शनिवारी दुपारी अबंड राज्यमहामार्गावरील घटना
चाळीस लाख रुपयांचे नुकसान
शहागड प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील शेवगा फाट्यावर हायवा ट्रक
वाहनाने पेट घेतला यावेळी हायवा जळून खाक झाल्याने 40 लाखांचे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
पोलिस सुत्रांकडून मिळाली सविस्तर माहिती आशी की पाथरवाला खुर्द येथील प्रणित हार्षे यांच्या मालकीचा हायवा ट्रक हा तिर्थपुरी-भोजगाव या रस्त्यावर शेतकऱ्यासाठी मळी घेऊन जात होता. परंतु दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान हायवाच्या समोरील कॅबिनने अचानक पेट घेतला. हा पेट इतका भयानक होता की, हायवाचा फक्त लोखंडी पत्रा शिल्लक राहिला आहे. ज्यामध्ये हायवाचे अंदाजे नुकसान 40 लाखा पर्यंत नुकसान झालेले आसून या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असेलेले झाडे-झुडपे होरपळून गेली.
गोंदी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही करत आगीत जळत आसलेला हायवा विझविण्यासाठी प्रयत्न केले.पंरतू रखरखत्या उन्हात हायवा जळून खाक झाला होता.यावेळी या हायवाचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला.यावेळी चालक मात्र प्रंसगसावधान ठेवून बाल-बाल बचावला
