जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र दिवसाआड दिवसभर सुरु ठेवावेत माजी आ. भीमराव धोंडे यांची मागणी
Ashti

जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र दिवसाआड दिवसभर सुरु ठेवावेत माजी आ. भीमराव धोंडे यांची मागणी
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
बीड जिल्ह्यात संचारबंदी असुन खरीप हंगामाची पुर्वतयारी सुरु आहे. खते,बी -बियाणे,शेतीऔजारे खरेदीसाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र दिवसाआड दिवसभर सुरु ठेवण्याचा मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार निलीमा थेऊरकर यांना माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिले. यावेळी ॲड.साहेबराव म्हस्के,बबनआण्णा झांबरे, अशोक साळवे, बाजीराव वाल्हेकर, जाकीर कुरेशी, बाबु कदम, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.
