अहमदनगर येथील दैनिक पुढारी चे उपसंपादक मुरलीधर तांबडे यांच्यासह कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण

अहमदनगर येथील दैनिक पुढारी चे उपसंपादक मुरलीधर तांबडे यांच्यासह कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण
पत्रकार संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करा महाराष्ट्र राज्य ग्रामीण नगर तालुका पत्रकार संघटनेचे प्रशासनास निवेदन
बीड (रिपोर्टर -गोरख मोरे )
अहमदनगर येथील दैनिक पुढारी चे उपसंपादक मुरलीधर तांबडे यांना दिनांक ४ मे मंगळवार रोजी केडगाव उपनगरात किरकोळ कारणावरून मुरलीधर तांबडे सह त्यांच्या कुटुंबियांना चौघांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली , आम्ही स्थानिक आहोत , आमच्या नादाला लागू नका , नाही तर आम्ही सोडणार नाहीत , अशी धमकी देखील यावेळी देण्यात आली .
याबाबत अभिजीत तांबडे राहणार (शास्त्रीनगर ) केडगाव यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरती तुषार घोगरे , राहुल ससाने , विशाल कोतकर , व मच्छिंद्र घोगरे यांचा पोलीस शोध घेत आहेत .
या घटना प्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यात पोलीस स्टेशन , तहसील कार्यालय मध्ये , पत्रकार मारहाण प्रकरणी निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
यावेळी शिवा मस्के , अन्सार शेख , केशव साबळे , रफिक शेख , श्याम कांबळे , साबील सय्यद , भारत पवार , रियाज पठाण , आदी पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते .
