रमजान निमित्ताने मुस्लिम युवकांची कडा येथील कोविड सेंटरला ६०० अंडी मदत

रमजान निमित्ताने मुस्लिम युवकांची कडा येथील कोविड सेंटरला ६०० अंडी मदत
धानोरा/प्रतिनिधी
सध्या कोरोना आपत्ती काळात अनेक जण आहाराच्या बाबतीत जागृत झाले असल्याने सध्या पौष्टिक आहारावर भर दिला जात आहे. त्यामध्ये अंडी,व चिकन मध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. कोरोना रुग्णांना देखील दररोज आहारात अंडी दिली जात आहे.आष्टी तालुक्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत त्याबरोबर त्याच्या उपचार करण्यासाठी कडा येथे अंबेश्वर ट्रेडर्स संचलीत अंबेश्वर आरोग्य मंदीर हॉस्पिटल केअर सेंटर सुरू झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांना नियमित आहार दिला जातो.यामध्ये आहारात दूध, अंडी यांचा समावेश आहे.शनिवार दि.८ कडा येथील कोविड रुग्णालयात निमगाव चोभा येथील मुस्लिम तरुणांनी पाच दिवस पुरतील एवढे ६००अंडी देण्यात आले यावेळी निमगाव चोभा येथील मुस्लिम समाजातील तरुण युवक इस्लाम सय्यद, आसिफ सय्यद,अजरुदिन सय्यद आमिर सय्यद, इस्लाम सय्यद, जाकिर सय्यद, फिरोज शेख, तयब शेख. शकील सय्यद, आजाद सय्यद, जमीर शेख, अजरुदिन शेख आदी उपस्थित होते
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोकांनी अंडी चिकन खावे असा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. कोविंड उपचार केंद्र आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांना रोज अंडी खायला दिली जात आहेत असे संचालक सागर आमले यांनी सांगितले.
