खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार लसिकरणाची वेळ 9 ते 5 असताना  सकाळी 7:30 लस संपल्याची कर्मचाऱ्यांची घोषणा       

Beed

खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार लसिकरणाची वेळ 9 ते 5 असताना  सकाळी 7:30 लस संपल्याची कर्मचाऱ्यांची घोषणा                           

धानोरा/वार्ताहर                

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि.27 रोजी  लसिकरणासाठी आलेल्या नागरिकांना सकाळी 7:30 वाजता  कर्मचारी यांनी लस संपली असे म्हणताच गोंधळ उडाला. लसिकरणाची वेळ 9 ते 5 अशी असताना सकाळी 7:30 ला लस संपतेच कशी?असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.प्राथमिक आरोग्य  केंद्रातील कर्मचारी हे आप आपल्या ओळखीच्या लोकांचे फॉर्म रात्रीच जमा करतात.त्यामुळे सकाळी येऊनही लस भेटत नाही.असा आरोप उपस्थितांनी केला.सकाळी 7:30च्या सुमारास आरोग्य केंद्रात 25 ते 30 लोकं उपस्थित असताना 200 लस संपतातच कसे?आरोग्य विभाग जनतेची सेवा करते आहे की शोषण असा प्रश्न लोणी सय्यदमीर गटाचे युवा नेते अमोल काकडे यांनी उपस्थित केला.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता लोकांची लस घेण्याकडे गर्दी होत आहे.खुंटेफळ प्रा आ केंद्र अंतर्गत असणाऱ्या वाड्या वस्त्या व जास्त अंतर असणाऱ्या गावातील लोकं सकाळी लवकर  लस घेण्यासाठी येतात परंतु दवाखान्यात ना पाण्याची सोय ना सावलीची सोय त्यात अडानी वयसकांची संख्या जास्त असल्याने त्यांना फॉर्म भरण्याची अडचन होते.त्यामुळे दवाखान्यात सावली व पिण्याच्या पाण्याची सोय करावी व जे हजर आहेत त्यांना लस द्यावी.अडाणी वयस्क लोकांना फॉर्म भरण्याची सक्ती करू नये,अशी मागणी युवराज खटके व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केली.तसेच करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लस प्रभावी ठरत असल्याचे लसीकरणावरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधामुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे  राज्य सरकारने घरोघरी जाऊन कोरोणा प्रतिबंधक लस द्यावी ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकरीचे ठरत आहे. १ मे नंतर तर १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन करोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम’ बीड जिल्ह्याने हाती घ्यावी.
पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठय़ा प्रमाणात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. याच धर्तीवर घरोघरी जाऊन करोनाची लस दिली तर करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल.असे मत मेजर अमर वाळके, सुंबेवाडी यांनी व्यक्त केले.

Sharing

Visitor Counter