प्रशासनाने हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा सोडून कोरोना संक्रमणाची गंभीर दखल घ्यावी.आ.विनायकराव मेटे

आ.विनायकराव मेटे यांनी सुस्त जिल्हा प्रशासनाला धारेवर धररले.
प्रशासनाने हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा सोडून कोरोना संक्रमणाची गंभीर दखल घ्यावी.आ.विनायकराव मेटे
बीड/वार्ताहर
कोरोनामुळे बीड जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झालेली असतांना प्रशासन सुस्त झालेले आहे. रेमडिसिवर इंजेक्शनचा तुटवडा, लसीचा तुटवडा, बेफिकीर आरोग्य यंत्रणा आणि बेजबाबदार सरकारी कर्मचारी यांच्यामुळे कोरोनाचा हाहाकार झालेला आहे. त्याअनुषंगाने आ. विनायकराव मेटे यांनी मा.जिल्हाधिकारी रविंद्र जगताप व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गिते यांच्या समवेत बैठक घेवून प्रशासनाच्या ञुट्या निदर्शनास आणून दिल्या यावेळी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात सुचना केल्या.डॉ.गिते यांच्या कार्यालयात जाऊन रुग्णांच्या अडचणी व जनतेच्या समस्या प्रशासनाच्या कानावर घातल्या.
कोराेणाचे रुग्ण तडफडत असतांना हे कागदी घोडे नाचवतात. हे कागदी घोडे नाचवणे बंद करा. रुग्णावर योग्य उपचार करून रुग्ण वाचतील याकडे लक्ष केंद्रित करा. तसेच शासकीय रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून ऑक्सिजन पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत त्याची साधी दखल घेण्याची गांभीर्यही प्रशासनाने घेतले नाही ही शरमेची बाब आहे असेही आमदार मेटे यांनी बैठकीमध्ये सुनावले
आ. मेटे यांनी बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ऑंटीजन टेस्ट कॅम्प का होत नाहीत ? संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे कॅम्प आयोजित केले जातात , बीडचे प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे? हे चांगल्या प्रशासनाची लक्षण असू शकत नाही_ म्हणून मोठ्या प्रमाणावर अटीजन टेस्ट करण्याचे काम प्रशासनाने करावे.ऑक्सिजन रुग्णांना वेळेवर कसा मिळेल , प्रशासनाने रुग्ण म्रत्युमुखी पडणार नाही याची खबरदारी घ्यावी.आणि सध्या बाजारात २५,००० ते ५०,००० रुपयात रेमडिसिवर इंजेक्शन मिळत असतांना प्रशासनाला हे इंजेक्शन कसे काय मिळत नाहीत. पाणी कुठे मुरते आहे आणि कोणापाशी मुरत आहे हे जनतेच्या लक्षात येत आहे त्यामुळे रेमडिसिवर इंजेक्शन बाबतचा काळाबाजार बंद केला पाहिजे त्याचबरोबर शासनाने रुग्णालयाचे वर्गीकरण केलेले आहे त्यानुसार दर आकारले जात आहे किंवा नाही यावर लक्ष असणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णाची देखभाल करणार्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सुविधा शासनामार्फत केली जावी. अशा अनेक सूचना आमदार मेटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी उद्यापासून रेमडिसिवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
.यावेळेस त्यांच्यासोबत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर बापू काकडे,जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, विनोद कवडे, शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत डोरले, विद्यार्थी आघाडीचे अक्षय माने, सामाजिक न्यायचे सुनील शिंदे, शेषेराव तांबे ,सौरभ तांबे,उद्योजक तापडिया व शिवसंग्रामचे तार्यकर्ते उपस्थित होते.
