धारुरच्या युवकांनी पोलीस बांधवांसाठी तयार केले सॅनिटायजेशन कक्ष

धारूर/इरफान शेख
जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे कोरोना ही महाभयंकर महामारी आहे या माहामारी पासून जनतेचा बचाव व्हावा यासाठी पोलीस बांधव २४ तास रस्त्यावर सज्ज उभे आहे
आज पोलीस बांधव स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत त्यांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून धारूर येथील तरुण व्यापारी केदार चिद्रवार , कल्पक चिद्रवार , अनुप डूबे, कृष्णा डूबे, ज्ञानेश्वर डूबे यांनी पोलिस बांधवांसाठी सॅनिटयजेशन कक्ष मा.पोलीस अधिक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई, यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक सुरेखा धस व नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या उपस्थितीत तयार करून पोलिस स्टेशन धारूर देण्यात आले.
या सॅनिटायजेशन कक्षात प्रवेश केल्यानंतर ७ सेकंदात संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण होणार आहे.कक्षात प्रवेश करताच सेन्सर द्वारे सॅनिटायजेशन फवारणी होणार आहे.
यामुळे पोलीस बांधवांचे आरोग्य चांगले राहणार आहे धारूर येथील तरुणांच्या या उपक्रमाचे बीड जिल्ह्यात कौतुक होत आहे.
