बीडकरांसाठी दिलासादायक बाब

Beed

बीडकरांसाठी दिलासादायक बाब

बीड/प्रतिनिधी

सध्या मराठवाड्यातील हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बीडमध्ये तरी सुदैवाने एकही रुग्ण सापडलेला नाही. शनिवारी पाठविलेले चारही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीडचा शुन्य कायम रहावा, यासाठी लोक हात जोडून आहेत.

बीडमध्ये जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथे १०० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. बाहेरून आलेल्या लोकांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवताच त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाते.

स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. आतापर्यंत ६४ स्वॅब हे पाठविले होते. यात शनिवारच्या चौघांचा समावेश होता. हे सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती बीडच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter