कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने नगरपंचायतच्या मुख्याधिकारी,नगराध्यक्षा यांच्यासह दोन नगरसेविका होम क्वारंटाईन

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने नगरपंचायतच्या
मुख्याधिकारी,नगराध्यक्षा यांच्यासह दोन नगरसेविका होम क्वारंटाईन
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या श्री दत्त मंदिर गल्लीमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांचे नमुने घेण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे तसेच हा रुग्ण ज्यांच्या संपर्कात आलेला आहे अशांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आष्टी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा व इतर दोन नगरसेविका यांचा समावेश असल्याने या पदाधिका-यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आष्टी शहरात शनिवारी 44 वर्षीय पुरुष हा कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर सदरील रुग्णाच्या संपर्कात येणारांची शोध मोहिम शनिवारी दिवसभर प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत होती.विशेष म्हणजे यामध्ये आष्टी शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या एका दुर्घटनेतील मृत्यृमुखी पडलेल्या महिलेच्या अंत्यविधीच्या वेळी सदरील कोरोनाग्रस्त रुग्ण आणि नगराध्यक्षा यांचा संपर्क झालेला होता.त्यानंतर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांची देखील भेट झाल्याचे यानंतर उघड झाले.शिवाय या भेटी दरम्यान इतर दोन महिला नगरसेवकांचा देखील संपर्क आल्याने नगरपंचायतच्या मुख्याधिकारी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा आणि इतर दोन नगरसेविका यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
