डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेवर संधी द्या

डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेवर संधी द्या
रवी काळे, गजानन जवकर यांची ना.अजितदादा पवार, ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी
बीड प्रतिनिधी
दि.२९ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविली. अल्पशा मताने त्यांचा निसटता पराभव झाला. त्यांच्याकडे बीडच्या विकासाचे व्हिजन आल्याने पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी युवा नेते रवी काळे, गजानन जवकर यांनी केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून बीड मतदारसंघात अनेक विकासाची कामे झाली. डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर यांनी मागील एक ते दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला. त्या माध्यमातून बीड मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे केल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जात होता. परंतु त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला. त्यांच्याकडे बीडच्या विकासाचे व्हिजन आहे. उच्चशिक्षित, कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. दीड ते दोन वर्षाच्या कालावधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत केले, ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे नेते ना.धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेवर डॉ.योगेश क्षीरसागर यांना संधी द्यावी, अशी मागणी युवा नेते रवी काळे, गजानन जवकर यांनी केली आहे.








