डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर घ्या- शेख शाकेरा 

Beed

डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर घ्या- शेख शाकेरा 

बीड प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार मजबूत करण्यासाठी डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त करण्याची मागणी शेख शाकेरा यांनी केली आहे.

डॉ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून, त्यांनी बीड विधानसभेत पक्षाची मजबूत संघटना उभारली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कमी मतांनी पराभव पत्करावा लागल्याने पक्षाच्या प्रतिष्ठेला काहीशी धक्का बसला आहे. परंतु, डॉ. क्षीरसागर यांनी या पराभवातूनही जिल्ह्यातील पक्षकार्य अधिक सक्षम करण्याचे काम केले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती अंमल सिद्ध करण्यासाठी तसेच पराभवाची भरपाई करण्यासाठी, डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर नियुक्त करून बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विनंती केली असून, जिल्ह्यातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Sharing

Visitor Counter