ग्राम महसूल अधिकारी बाबुराव शिंदे यांना नालंदा ऑर्गनायझेशनकडून पुरस्कार

Beed

ग्राम महसूल अधिकारी बाबुराव शिंदे यांना नालंदा ऑर्गनायझेशनकडून पुरस्कार

 

प्रतिनिधी | बीड 

दि.२९ : केज तालुक्यातील होळ येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) बाबुराव काशिनाथ शिंदे यांना पुणे येथे नालंदा ऑर्गनायझेशनकडून ‘राज्यस्तरीय आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 

बाबुराव शिंदे मूळचे होळ येथील असून त्यांनी गेली अनेक वर्ष पुणे जिल्ह्यात महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी पदावर काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते केज तालुक्यात कुंबेफळ येथे कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नालंदा ऑर्गनायझेशनकडून पुणे येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Sharing

Visitor Counter