सेवा सोसायटीच्या नविन पिक कर्ज वाटपाचा लाभ घ्या- नितिन शिनगारे

सेवा सोसायटीच्या नविन पिक कर्ज वाटपाचा लाभ घ्या- नितिन शिनगारे
किल्लेधारूर/इरफान शेख
दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड अंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म. धारूर ता.धारूर जि. बीड च्या पात्र खातेदारांना संस्थे मार्फत नविन पिक कर्ज वाटप करण्यात येणार असुन याचा लाभ पात्र खातेदारांनी घ्यावा असे आवाहन धारुर सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन नितिन शिनगारे यांनी केले आहे.
दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड व सहायक निबंधक यांनी दिलेल्या आदेशान्वये सदरील कर्ज वितरण करण्यात येणार आहे. कर्ज मंजूरी ही दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली बीडचे मुख्य कार्यालय देणार आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म. धारूर ता धारूर जि बीड च्या पात्र खातेदारांनी आप आपली आवश्यक कागदपत्रे कर्ज मागणी अर्ज, ८अ, ७-१२, डिक्लेरेशन फॉर्म, आधार कार्ड, पॅनकार्ड दि .बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा धारूर चा बचत खाते क्रमांक संस्थेचे सचिव वैभव रंदवे यांच्याकडे सादर करावेत. तरी जास्तीत जास्त संस्थेच्या पात्र खातेदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे व्हाईस चेअरमन नितिन शिनगारे व संस्थेचे संचालक मंडळा वतिने करण्यात आले आहे.
