स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चोरीच्या 09 मोटर सायकल केल्या जप्त

Beed

मागील काही दिवसामध्ये जिल्हयामध्ये घडणा - या मोटर सायकल चोरीच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांना योग्य सुचना देवुन नमुद गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते . पो.नि. स्थागुशा यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन करुन सदर गुन्ह्यातील आरोपींची माहीती घेणेबाबत सुचना दिल्या होत्या . त्यांसदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करता असताना काल दिनांक 14/9/2022 रोजी खात्रीशिर माहिती मिळाली की , इसम नामे दत्ता मुदळ रा . वडळी , ता . शिस्त्र का . जिल्हा बीड हा इसम चोरीची मोटर सायकल वापरत आहे . तेव्हा नमुद इसमाला मौजे वडळी येथुन ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली तेव्हा नमुद इसमास अधिक विश्वासात घेवून विचारपुर केली असता त्याने सदरची मोटार सायकल हि साधारण एक ते दिड वर्षापुर्वी मोटार सायकल चोरी करणारे इसम नामे सोनु गोलवड व दिपक बर्डे दोघे राहणार अंमळनेर , ता . पाटोदा , जिल्हा बीड यांचेकडुन खरेदी केली असल्याचे माहिती दिली . तसेच अधिक चौकशीमध्ये माहिती प्राप्त झाली की नमुद चोरी करणारे दोन्ही इसम नामे सोनु गोलवड व दिपक बर्डे यांनी अहमदनगर , जामखेड , करमाला , पुणे इत्यादी भागातुन चोरी केलेल्या 08 मोटरसायकली इसम नामे दत्ता मुदळ याच्या ओळखीने मौजे वडळी , ता . शिरुर , जिल्हा बीड या गावातील आठ लोकांची फसवणुक करुन त्यांना चोरीच्या मोटार सायकली या स्वतःच्या कुटुंबीयाच्या व नातेवाईकांच्या असल्याचे सांगुण व नमुद मोटार सायकलीचे कागदपत्रे नंतर देतो असे सांगुण कमी किंमतीमध्ये विक्री केल्या होत्या म्हणुन फसणुक करुन विक्रि केलेल्या सर्व मोटार सायकली या वडळी गावातील लोकांकडुन ताब्यात घेवून पोलीस ठाणे शिरुर येथे नेहुन सरकार तर्फे फिर्याद देवुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तरी चोरीची मोटार सायकल खरेदी करणारा व गावातील लोकांना चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यास मदत करणार इसम नामे दत्ता मुदळ याला ताब्यात घेण्यात आले असुन चोरी करणारे दोन्ही इसमाचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे शिरुर शोध घेत असुन आरोपीकडुन आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीडचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे .

Sharing

Visitor Counter