आष्टी येथे युवक पत्रकार अविशांत कुमकर यांचे मुक आंदोलन

आष्टी येथे युवक पत्रकार अविशांत कुमकर यांचे मुक आंदोलन
आष्टी/प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख हे पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे शनिवार दि. 1 मे रोजी आपल्या राहत्या घरी कोरोनाचे नियम पाळुन एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते त्याला पाठिंबा म्हणुन आष्टी येथील युवक पत्रकार अविशांत कुमकर यांनी आपल्या घरी आज महाराष्ट्र दिनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन दिवसभर मुक राहुन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस.एम.देशमुख यांना पाठींबा देत आंदोलन सुरु केले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस.एम.देशमुख यांनी पुकारलेल्या आंदोलानाने प्रशासनाच लक्षकेंद्रीत करण्यासाठी हे आंदोलन सुरु केले आहे. कोरोनाच्या या संसर्गाने महाराष्ट्रात अनेक पञकार मृत्यूमुखी झाले आहेत.आज ही बरेच पञकार झुंज देत आहेत यासाठी शासनाने योग्य ती जलदगतीने पावले उचलावीत या मागणी करीता एस.एम.देशमुख हे आज आत्मक्लेश आंदोलन करीत असुन त्यांच्या याआंदोलनास परळीतील जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम आष्टी येथील आज मराठी न्यूजचे संपादक अविशांत कुमकर यांनी कोरोनाचे नियम पाळुन दिवसभर घरीच राहुन एस.एम.देशमुख यांना पाठींबा देण्यासाठी मुक आंदोलन सुरू केले आहे.
