अजीजपुरा ,बलभीम चौक ,जुना बाजार ,राजुरी वेस भागातील नागरिकांसाठी काय सोय केली?

मग 'त्या' लोकांची सोय कशी?
अजीजपुरा ,बलभीम चौक ,जुना बाजार ,राजुरी वेस भागातील नागरिकांसाठी काय सोय केली?
बीड/प्रतिनिधी
कोरोना सारख्या आपत्तीला लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बीड जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच कहर केला आहे कोणाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासन आपली चांगली भूमिका पार पाडताना दिसत आहे कठोर प्रयत्न करत आहे
परंतु जिल्हा प्रशासनाने बीड शहरात अजीजपुरा,बलभीम चौक, जुना बाजार,राजुरी वेस हे कंटेनमेंट जोन घोषित केलेले आहे मात्र या भागातील जुना बाजार ते राजुरी वेस हे भाग कडकडीत बंद करून रस्त्यावर बॅरिकेट्स लावून पत्रेसुद्धा लावण्यात आलेली आहे. यामुळे या भागातील स्थानिक नागरिकाला साधे दूध सुद्धा उपलब्ध होत नाही तसेच किराणा ,भाजीपाला देखील उपलब्ध होत नसल्याने स्थानिक नागरिकांची अडचण होत आहे.
या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या संदर्भात कसलेच आदेश काढले नाही व सर्व काही कडकडीत बंद असल्यामुळे काही कुटुंबांना खायचा सामान देखील उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे व या भागातील नागरिकांचा कंटेनमेंट जोन ला घेऊन कसलीच अडचन नाही मात्र प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू चा पुरवठा करावा अशी मागणी नागरीक करत आहे.
