ब्राह्मणगाव ता. गेवराई येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Beed

ब्राह्मणगाव ता. गेवराई येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी

ब्राह्मणगाव ता. गेवराई येथील कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे मौ. ब्राह्मणगाव येथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

याबाबत केईएम हॉस्पिटल, मुंबई द्वारे माहिती प्राप्त झाली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मौ. ब्राह्मणगाव ता. गेवराई येथे कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Sharing

Visitor Counter