तर... नाभिक समाज टोकाचे पाऊल उचलेल-कवी प्रेम पवळ

तर... नाभिक समाज टोकाचे पाऊल उचलेल-कवी प्रेम पवळ
या कोरोना महामारीने आणि त्याच्या कारणाने इच्छा नसताना केलेले या लॉकडाऊन मध्ये अनेक हातावरचे पोट असणारे छोट्या उद्योग धंद्यावाले हे कोलमडून गेले असुन त्या मध्ये असणारा नाभिक समाज हा पुर्ण पणे हताश झाला असुन आत्महत्या करण्यापलिकडे त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही असा वैयक्तिक माझा हा गैरसमज नसुन सत्य समज आहे आणि यावर केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने लवकर लवकर पाठ पुरावा करुन या समाजाला आर्थिक मदत कोणाच्या हात नाही तर त्यांच्या खात्यात वर करावी आणि कोलमडून गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना सावरावं..!
शासनाचे अनुदान ही नाही व हाताला काम नाही नाही नाभिक समाज या संकटामुळे हरबल.
सध्या जगभरात कोरोना विषाणूचा साथीने थैमान घातले आहे मानवी समूहाला जिवंत राहणे हीच आपली प्राथमिकता वाटत आहे परंतु या महामारी मध्ये महाराष्ट्रातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत स्वतःला व आपल्या कुटुंबातील लहान मुले वृद्ध आई-वडील त्यांचे पालनपोषण करण्यासाठी व रोजच्या रोज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठलीही आर्थिक आवक नसल्यामुळे दुकाने बंद असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नाभिक समाज मृत्यूच्या वाटेवर आहे नव्हे नव्हे तर एका नाभिक बांधवाने आर्थिक संकटामुळे आपली जीवनयात्रा संपवली जर सलुन दुकान चालू ठेवल्यामुळे करुणा चा प्रादुर्भाव वाढत असेल तर इतर देशांमध्ये तो वाढला आहे आम्ही समाज बांधव दुकाने बंद ठेवून आमच्या कुटुंबाला व सर्व समाजाला करण्यापासून वाचू शकत असतो तर नक्कीच शासनाच्या नियमानुसार दुकाने बंद ठेवून परंतु शासनाने प्रत्येक नाभी कुटुंबाला 10 ते 20 हजार रुपयांचे मानधन द्यावे प्रत्येक कारागिरांना मानधन द्यावे दुकानाचे भाडे द्यावे तसेच नाभी कुटुंबातील मुला-मुलींच्या पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या फीचे पैसे द्यावेत कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांचा प्रत्येकी 50 हजार रुपयांचा आरोग्य विमा उतरवावा तीन महिन्यापासून करुणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग आशा सेविका अंगणवाडी सेविका पत्रकार सर्व स्तरातील लोक आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत या सर्वांना नाभी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा त्रिवार सलाम मुळे सत्तर दिवस आपण अधिकार दुकाने बंद ठेवल्या आणि दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला आहे राज्यातील नाभिक समाजाची संख्या सुमारे 50 लाख आहे त्यातले साधारण पंचवीस लाख पारंपरिक व्यवसाय करतात शासनाने सलून व्यवसाय त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व नाभिक समाजाचा समाजाला मानधन जमा करावी सर्व शासकीय नियमानुसार सर्व व्यावसायिक सर्व स्वच्छता पाळून आपले व्यवसाय करण्यासाठी शासनाची परवानगी द्यावी सर्व समाज बांधवांकडून मागणी होत आहे काय लावून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम नाभिक समाजाने केले परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही योग्य न्याय मिळाला नाहीतर सर्व नाभिक समाज टोकाचे पाऊल उचलले शिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी अशी नाभिक समाजाच्या वतीने कवी प्रेम पवळ यांनी नमुद केले.
