उमाकिरण कोचिंग प्रकरण: प्रा. विजय पवार व प्रा. प्रशांत खाटोकर अटकेत
Beed

उमाकिरण कोचिंग प्रकरण: प्रा. विजय पवार व प्रा. प्रशांत खाटोकर अटकेत
बीड प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी फरार असलेले उमाकिरण कोचिंगचे प्रा. विजय पवार व प्रा. प्रशांत खाटोकर यांना स्थानिक गुन्हे शाखेने आज पहाटे अटक केली. वर्षभर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा मुलीचा आरोप असून, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता. पोलिसांनी लिंबागणेश व मांजरसुंबा येथे ही धडक कारवाई केली. अटकेनंतर नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, कोचिंग संचालकांची चौकशीची मागणीही जोर धरत आहे.








