कोळवाडी जवळ कंटेनर व मोटरसायकलचा भीषण अपघात; एक ठार

कोळवाडी जवळ कंटेनर व मोटरसायकलचा भीषण अपघात; एक ठार
बीड प्रतिनिधी
कोळवाडी जवळ कंटेनर व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना बुधवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख अथर शेख दाऊद (वय 47, रा. मोहम्मदिया कॉलनी, बीड) हे मांजरसुंबा कडून बीडकडे मोटरसायकलने (क्रमांक MH23 AH 9986) येत असताना, कोळवाडी गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख अथर यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, अपघात घडवून आणलेल्या कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत अशी माहिती प्राथमिक स्वरूपाची मिळाली आहे .या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.








