धारुर शहरातील रस्त्यांची झाली चाळण!
Dharur

धारुर शहरातील रस्त्यांची झाली चाळण
किल्लेधारुर/रवि गायसमुद्रे
शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत.रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे येणार्या जाणार्या नागरिकांना आपला जीव धोक्यात ठेऊन याचा सामना करावा लागत आहे.गेल्या तीन चार दिवसा पासून पाऊस पडत आहे.त्यामूळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे.
पावसाळा सुरू होण्यापुर्वीच नगरपालिकेने शहरातील रस्त्याच्या खड्डे बूजवण्याचे,डांबरीकरण काम केले पहिजेत परंतु नगरपालिकेने जून महिन्याचे पंधरा दिवस होऊन देखिल रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे काम केलेले दिसून येते नाही.
यामुळे शहरातील नागरीक संताप व्यक्त करत आहेत नगरपालिकेन लवकरात शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु करावे असे शहरातील नागरिकांचे म्हणने येत आहेत.
