परळीत कायदा हातात घेणारांवर गुन्हे दाखल

Beed

कायदा हातात घेणारांवर गुन्हे दाखल

बीड प्रतिनीधी 

मस्साजोग (ता. केज) येथे घडलेल्या घटनेच्या तपासादरम्यान, परळी बीड रोडवरील पांगरी कॅम्प, वान नदीचे पूल, टोकवाडी आणि कन्हेरवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर अज्ञात इसमांनी वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी 1:30 ते 3 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, समाधान कवडे आणि त्यांच्या पथकाने सार्वजनिक वाहतूक सुरळीत केली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 126 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच, परळी शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर परळी-संगम रस्त्यावरही अशाच प्रकारे टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. या घटनेची दखल घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या पथकाने वाहतूक सुरळीत केली आणि आरोपींवर कलम 126 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.परळी शहर व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, दि. 13 जानेवारी 2025 पासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे आव्हान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Sharing

Visitor Counter