बीड शहरात गोळीबार; चार गंभीर जखमी!
Beed

बीड शहरात गोळीबार; चार गंभीर जखमी!
बीड वार्ताहर
बीड शहरातील शिवाजीनगर हद्दीतील दोन गटात वाद झाला असून याचे रूपांतर गोळीबारात झाले आहे तर या गोळीबारात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक स्वरूपाचे माहिती मिळत आहे.
बीड शहरातील कालिका नगरसमोर दोन गटात भांडण झाले या भांडणाचे रूपांतर गोळीबारात झाले तर यात चार गंभीर जखमी झाले तर पाच गोळ्या हवेत झाडण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. या भांडणात तलवारबाजी देखील झाली. भांडणाचे कारण अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस तैनात करण्यात आला आहे. तसेच जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
