अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध - कुंडलिक बापु खांडे

Beed

अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध - कुंडलिक बापु खांडे

नसीर खान यांच्या नेतृत्वाखाली मोहम्मदिया कॉलनीतील असंख्य युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बीड/प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 22 मधील मोहम्मदिया कॉलनी येथील असंख्य युवकांनी उप शहरप्रमुख नसीर खान यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

      असे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व दबंग शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक बापु खांडे यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेऊन व बाळासाहेबांची शिवसेना उप शहरप्रमुख नसीर खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रभाग क्रमांक 22 मधील मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा भागातील शेख नदीम,मोमीन समीर,आमेर शेख,असलम शेख,चांद शेख,राहिल शेख,सोफीयान मोमीन,इरफान शेख,शेख मतीन,शेख जफर,सय्यद जफर,अब्बास अली,जुनेद शेख़ सह असंख्य युवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

       कार्यक्रमात बोलताना जिल्हाप्रमुख कुंडलिक बापु खांडे म्हणाले की शिंदे सरकार अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून युद्धपातळीवर अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्याचे सरकार प्रयत्न करत आहे.मोहम्मदिया कॉलोनी आणि मोमीनपुरा भागातील युवकांनी बाळासाहेबांचे शिवसेनेत केलेला जाहीर प्रवेश याची साक्ष देत आहे.यावेळी मंचावर शहरप्रमुख कल्याण बापू कवचट,सोशल फायटर गणेश बाप्पा उगले,उप शहरप्रमुख नसीर खान, सह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Sharing

Visitor Counter