स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

Beed

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास एलसीबीने ठोकल्या बेड्या

बीड प्रतिनिधी 

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुकुडगाव, ता. जि. बीड येथे दिवसा घरफोडी करून रोख रक्कम चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दि. 12 जानेवारी 2026 रोजी कुकुडगाव येथील रहिवासी इंदरराव रामभाऊ नवले यांनी घराला कुलूप लावून बाजारासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेप्रकरणी पिपंळनेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा सराईत गुन्हेगार भगवान ईश्वर भोसले व त्याचा भाऊ कु-या ईश्वर भोसले (दोघे रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर; मुळ रा. नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी मिळून केला आहे. यापैकी भगवान ईश्वर भोसले हा नागझरी येथे आल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागझरी येथे छापा टाकून आरोपी भगवान ईश्वर भोसले यास ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने पिपंळनेर पोलीस ठाणे गु.र.नं. 08/2026 व आष्टी पोलीस ठाणे गु.र.नं. 16/2026 अन्वये कलम 305, 331 (3) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे केल्याची कबुली दिली.सदर आरोपीस पुढील तपासकामी पिपंळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पिपंळनेर पोलीस करीत आहेत.ही कामगिरी पोलीस अधीक्षक व मा. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि खटावकर, पोह. अशोक दुबाले, पोह. सोमनाथ गायकवाड, पोह. बाळू सानप, पोह. विकास राठोड, पोह. अंकुश वरपे, पोअ. अर्जुन यादव, पोअ. 2210 अशफाक सय्यद, पोअ. मनोज परजणे व चापोअ. सिद्धेश्वर मांजरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Sharing

Visitor Counter