परळी वैजनाथ येथे पोलीस पाटील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; गुण जाहीर न करता मुलाखतीची यादी प्रसिद्ध

Beed

परळी वैजनाथ येथे पोलीस पाटील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; गुण जाहीर न करता मुलाखतीची यादी प्रसिद्ध

बीड प्रतिनिधी 

परळी वैजनाथ (उपविभागीय कार्यालय) अंतर्गत रिक्त पोलीस पाटील पदाच्या भरती प्रक्रियेबाबत सध्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि शंका व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पाटील पदासाठी २२ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेस मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी पात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सुमारे ३८७ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.मात्र, परीक्षेतील गुणपत्रक जाहीर न करता थेट मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे काही उमेदवारांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची माहिती उपलब्ध न झाल्याने, निवड प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला जात असल्याची चर्चा आहे.पात्र उमेदवारांच्या मुलाखती २६, २७ आणि २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असले तरी अपात्र उमेदवारांना त्यांचे गुण, कट-ऑफ निकष किंवा अपात्रतेचे कारण समजणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.या संदर्भात संबंधित प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असल्याचे मत काही उमेदवारांनी व्यक्त केले आहे. निवड प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter